

Street dog attack
ESakal
दिवा : दिवा परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल सायंकाळी अंदाजे ५.३० वाजता काळुबाई बिल्डिंग, विकास म्हात्रे गेट परिसरात दोन वर्षांची बालिका वेदा विकास काजारे ही चालत असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर मागून हल्ला केला.