esakal | शिवसेना एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena will not attend meeting with NDA

उद्या एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होणार आहे, पण याला शिवसेना उपस्थित राहणार नाही, अशी माहिती कळते. शिवसेनेने अद्याप अधिकृतरित्या एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणा केली नसली, तरी शिवसेना खासदार उद्या या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. 

शिवसेना एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, कारण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षात नक्की कोण बाजी मारेल याची कोणालाच कल्पना नाही. अशातच उद्या एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होणार आहे, पण याला शिवसेना उपस्थित राहणार नाही, अशी माहिती कळते. शिवसेनेने अद्याप अधिकृतरित्या एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणा केली नसली, तरी शिवसेना खासदार उद्या या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतिदिन असल्याने उद्या शिवसेनेचे खासदार एनडीएच्या बैठकीला उपस्थित राणार नाहीत, अशी प्राथमिक माहिती आहे. तसेच उद्या सत्तास्थापनेच्या चर्चेसाठी सोनिया गांधी व शरद पवार यांचीही दिल्लीत बैठक होईल. या बैठकीलाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत. आधी उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती होती, पण उद्या बाळासाहेबांचा स्मृतिदिन असल्याने तेही या बैठकीला जाणार नाहीत. सोनिया गांधी व शरद पवार किमान समान कार्यक्रम ठरवतील अशी माहिती आहे.   

संजय राऊतांनी आज काय ट्विट केलंय, बघा!

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलण्यास नकार दिला. दररोज पत्रकार परिषद घेणाऱ्या राऊतांनी आज का नकार दिला याचे कारण अद्याप कळू शकले नाही. तर त्यांनी आजही ट्विट केले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेला झुकते माप देण्याची शक्यता

राऊतांनी आज ट्विट करताना म्हणले आहे की, 'यारों नये मौसम ने ये एहसास किया है| याद मुझे दर्द पुराने नहीं आते - बशीर बद्र' असे ट्विट करून त्यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. नवीन घडणाऱ्या सत्तासमीकरणांमुळे जुन्या राजकारणावर पांघरूण पडले आहे. यापूर्वी असलेल्या भाजप व शिवसेनेच्या युतीबाबतच हे वक्तव्य राऊतांनी केले असेल का? एका पत्रकार परिषदेत त्यांना या दररोजच्या ट्विटबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की, हिंदीतील अनेक कवी माझ्या आवडीचे आहेत. त्यांच्या मला पटणाऱ्या काही ओळी मी दररोज ट्विट करतो. यातून कोणाला काही संदेश पोहोटविण्याचा हेतू नाही. त्यांनी असे स्पष्टीकरण दिले असले, तरी त्यांचे रोजचे ट्विट हे भाजपला टोला लगावणारे असते.

loading image