esakal | संजय राऊतांनी आज काय ट्विट केलंय, बघा!
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena MP Sanjay Raut tweets on 16 November

दररोजच्या ट्विटबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की, हिंदीतील अनेक कवी माझ्या आवडीचे आहेत. त्यांच्या मला पटणाऱ्या काही ओळी मी दररोज ट्विट करतो. यातून कोणाला काही संदेश पोहोटविण्याचा हेतू नाही. त्यांनी असे स्पष्टीकरण दिले असले, तरी त्यांचे रोजचे ट्विट हे भाजपला टोला लगावणारे असते.

संजय राऊतांनी आज काय ट्विट केलंय, बघा!

sakal_logo
By
टीम ईसकाळ

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पुन्हा ट्विट केले आहे. नेटकरी दररोज सकाळी त्यांच्या ट्विटची वाट बघत असतात. आजही त्यांनी कवी बशीर बद्र यांच्या कवितेतील चार ओळी पोस्ट केल्या आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राऊतांनी आज ट्विट करताना म्हणले आहे की, 'यारों नये मौसम ने ये एहसास किया है| याद मुझे दर्द पुराने नहीं आते - बशीर बद्र' असे ट्विट करून त्यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. नवीन घडणाऱ्या सत्तासमीकरणांमुळे जुन्या राजकारणावर पांघरूण पडले आहे. यापूर्वी असलेल्या भाजप व शिवसेनेच्या युतीबाबतच हे वक्तव्य राऊतांनी केले असेल का? एका पत्रकार परिषदेत त्यांना या दररोजच्या ट्विटबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की, हिंदीतील अनेक कवी माझ्या आवडीचे आहेत. त्यांच्या मला पटणाऱ्या काही ओळी मी दररोज ट्विट करतो. यातून कोणाला काही संदेश पोहोटविण्याचा हेतू नाही. त्यांनी असे स्पष्टीकरण दिले असले, तरी त्यांचे रोजचे ट्विट हे भाजपला टोला लगावणारे असते.

काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेला झुकते माप देण्याची शक्यता

लिलावतीमधूनही ट्विट
11 नोव्हेंबरला राऊतांची अँजिओप्लास्टी झाली. तरीही त्यांनी लिलावती रूग्णालयतून ट्विट केले होते. तसेच दुसऱ्या दिवशी त्यांनी रूग्णालयातूनच अग्रलेख लिहिला होता. त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. शरद पवारांपासून ते भाजपच्या नेत्यांपर्यंत सर्व नेत्यांनी रूगणालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यांना डिस्चार्ज मिळाला असून आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. 

अब हारना और डरना मना है : संजय राऊत

सत्तासंघर्षांत कोणताच पक्ष बहुमत सिद्ध करू न शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. शिवसेना व संजय राऊतांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण मुदतीच्या आत सत्तास्थापन करण्यास ते अपयशी ठरले. आता काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी आघाडी होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यामुळे या सत्तासंघर्षात सत्तासमीकरण बदलणार का याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

फायटर संजय राऊतांनी रूग्णालयातून लिहिले संपादकीय!

loading image
go to top