esakal | 'डॉक्टर असाल तर आपल्या घरी', शिवसेना नगरसेविकेची धमकी

बोलून बातमी शोधा

संध्या दोशी
'डॉक्टर असाल तर आपल्या घरी', शिवसेना नगरसेविकेची धमकी
sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: कोरोना व्हायरसच्या सध्याच्या परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. एकाबाजूला कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती आहे. मुंबईत ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्यामुळे भाभा रुग्णालयाबाहेर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे.

मुंबईतील आरोग्य व्यवस्थेची स्थिती लक्षात घेता, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जनतेने देखील सहकार्य करणं आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींवर तर उलट जास्त जबाबदारी आहे. पण शिवसेनेच्या बोरीवलीच्या नगरसेविका संध्या दोशी यांना कदाचित याचा विसर पडला असावा. बोरीवलीच्या भगवती रुग्णालयात डॉक्टरांबरोबर वाद घालतानाचा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा: 'महापालिकेचे सात आयुक्त फुकट पगार खायला नेमलेत का?'

यामध्ये डॉक्टरांशी हुज्जत घालत त्यांना धमकावताना संध्या दोशी दिसतात. "डॉक्टरांना नीट बोलायला शिकवा, दहा हॉस्पिटलमध्ये दहा डॉक्टर उभे करीन. डॉक्टर असाल तर आपल्या घरी, डॉक्टर मला शहाणपणा शिकवतोय" या शब्दात त्यांनी एका डॉक्टरबरोबर वाद घातला. कांदिवली चारकोपमधुन नगरसेविका असलेल्या संध्या दोशी या शिक्षण समितीच्या अध्यक्षही आहेत.