आम्हाला गृहित धरू नका शिवसेनेचे भाजपला प्रत्युत्तर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

मुंबई - भारतीय जनता पक्षाने राज्यात एनडीए सरकार येईल, अशी सामोपचारी भूमिका घेतली असली तरीही शिवसेनेने मात्र आम्हाला गृहित धरू नका, असे सुनावले आहे. 

मुंबई - भारतीय जनता पक्षाने राज्यात एनडीए सरकार येईल, अशी सामोपचारी भूमिका घेतली असली तरीही शिवसेनेने मात्र आम्हाला गृहित धरू नका, असे सुनावले आहे. 

राज्यात शिवसेनेला स्वत: समवेत ठेवायचा भाजपचा विचार आहे. बेरजेच्या राजकारणासाठी भाजपला शिवसेनेला सोबत ठेवायचे आहे; मात्र शिवसेनेने सध्या भाजप सरकारबद्दल असलेल्या नाराजीमुळे शांत रहायचे ठरवले आहे. पक्षासंबंधीच्या जनभावना लक्षात घेऊन पुढे काय करायचे ते ठरवावे, असे निश्‍चित झाले आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या प्रवक्‍त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आम्हाला गृहित धरू नका, असे संकेत दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. भाजपबाबत नेमके काय करायचे, त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यास अद्याप वेळ आहे असे सांगितले जाते. भाजपशी युती करायची असेल तर त्या संबंधीचा निर्णय लवकरच येत्या काळात घेतला जाईल, असे पक्षातर्फे स्पष्ट केले आहे. 

Web Title: Shivsena's reply to the BJP