

High Court
Sakal
मुंबई : शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाकडून आता घुसखोरांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. मानखुर्द तुर्भे-मंडाळे येथील शिवशाहीच्या इमारत क्रमांक ३३ मध्ये ४८ जण तीन वर्षांपासून बेकायदा वास्तव्य करीत आहेत. न्यायालयानेही त्यांना बेकायदा ठरवत घुसखोर म्हणून जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर आठवडाभरात कारवाई करून सदनिका रिकाम्या केल्या जाणार आहेत.