शिवशाहीला वेग मर्यादा असावी - प्रवाश्यांची मागणी

नंदकिशोर मलबारी
मंगळवार, 26 जून 2018

सरळगांव (ठाणे) - थोड्या दिवसात प्रवाशांच्या पसंतिस उतरलेल्या प्रवासी वाहातूक करणा-या शिवशाही बसच्या वेगावर मर्यादा घाला. अशी मागणी या बस मधून प्रवास करणारे प्रवासी व रस्त्यावरून छोटे वाहान चालवणा-या वाहान चालकांकडून होत आहे.  

सरळगांव (ठाणे) - थोड्या दिवसात प्रवाशांच्या पसंतिस उतरलेल्या प्रवासी वाहातूक करणा-या शिवशाही बसच्या वेगावर मर्यादा घाला. अशी मागणी या बस मधून प्रवास करणारे प्रवासी व रस्त्यावरून छोटे वाहान चालवणा-या वाहान चालकांकडून होत आहे.  

उन्हाळ्यात गारे गार प्रवास करावयास मिळत असल्याने प्रवाशांनी या बसला चांगलीच  पसंती दिल्याचे चित्र सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. पण गेल्या दोन महिन्यापासून  या बसचे झालेले अपघात अठवताच बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना ए. सी. असतानाही घाम फुटत असल्याचे प्रवाशी सांगत आहेत. जलद प्रवास व गारे गार प्रवास होत असल्याने नेहमीच्या बस पेक्षा जास्त भाडे देऊन शिवशाही बस मधून प्रवाशी प्रवास करतात. प्रत्येक आगारत  को-याकरकरीत बस असल्याने बस चालकही वेगावर मर्यादा न ठेवता भर वेगात बस हाकलण्यात धंन्यता मानतात.

कल्याण -अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरून माळसेज घाट मार्गे अनेक बस प्रवास करीत आहेत. या बसचे चालक रस्त्यावरून बस चालवत असताना कोणत्याही छोट्या वाहनांची पर्वा न करता बस चालवत असल्याने अनेक जणांचे अपघात होता-होता  वाचल्याचे ऐकावयास मिळत आहे. तर अती वेगात बस चालवत असल्याने या बस मधून प्रवास करणारे प्रवाशीही आपला जीव मुठीत धरून बसत असल्याचे केशव बाघ, दया भागत, सुदाम पवार, भगवान देसले असे अनेक प्रवाशी सांगतात. भर वेगात ओरटेक करणे, रात्रीच्या वेळी अपर डीपर न मारणे, ओरटेक करत असताना छोट्या वाहनांची तमा न बाळगणे या सर्व गोष्टी रोज घडत असल्याने प्रवास करणा-या छोट्या वाहान चालकांना या बस बद्दल कायमची भीती वाटत असल्याने परिवहन खात्याने या बसच्या चालकांना  समज द्यावी व वेग मर्यादेवर बंधन घालावे असी मागणी होत आहे.

Web Title: Shivshahi should have a speed limit - the demand for passengers