शिवस्मारकाविरोधातील याचिकांची एकत्र सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

मुंबई - अरबी समुद्रात शिवस्मारकाची उभारणी करण्यासाठी निधीची तरतूद कशी कराल, असा सवाल राज्य सरकारला करतानाच या स्मारकाला विरोध करणाऱ्या सर्व याचिकांवर उच्च न्यायालयाच्या एकाच खंडपीठात एकत्रित सुनावणी घेण्यात येईल, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले.

अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याच्या राज्य सरकारच्या प्रकल्पाला विरोध करणारी जनहित याचिका मोहन भिडे यांनी उच्च न्यायालयात केली होती. राज्यावर प्रचंड कर्ज असताना तीन हजार सहाशे कोटींचा खर्च स्मारकावर करण्याचा अट्टहास का? निधीची तरतूद राज्य सरकार कशी करणार, असा सवाल याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे. न्या. रणजित मोरे आणि न्या. अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.

Web Title: shivsmarak oppose petition result