महाराष्ट्र दिनानिमित्त अंधेरीत शोभायात्रा

महाराष्ट्र दिनानिमित्त अंधेरीत शोभायात्रा

मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी अंधेरी रेल्वेस्थानकाजवळ मोटर्स ऑफ अंधेरी युवकांच्या समितीतर्फे सकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ‘तरुणाईतील एकोपा’ अशा संकल्पनेवर शोभायात्रा असणार आहे. 

स्वास्थ्यरंग परिवाराच्या संकल्पनेतून सामाजिक एकोप्याचे संदेश देणाऱ्या १५ बाय ५० फुटांच्या रांगोळीच्या प्रात्यक्षिक सकाळी ८ वाजता यात्रेची सुरुवात होईल. जोगेश्‍वरीतील नावाजलेल्या स्वस्तिक ढोल पथकाचेही सादरीकरण होईल. पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणारे तरुण-तरुणी यात्रेचे विशेष आकर्षण असेल. मुलांसोबत तरुणीही बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. बाईक रॅलीचे प्रमुख प्रतिनिधित्व दुकाचीवर स्वार झालेल्या पारंपरिक वेशभूषेतील महिला आणि तरुणी करतील. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिराज इनामदार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून बाईक रॅलीची सुरुवात करण्यात येईल. शोभायात्रेत सिद्धार्थ नगर सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन महाडेश्‍वर मित्र मंडळाच्या रॅलीतून होईल. रॅलीचा समारोप लोखंडवाला बॅक रोडमध्ये करण्यात येईल. दर वर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी पाड्यात मदतीचा हात म्हणून उपक्रम राबवण्यात येत आहेत. उपक्रमातून जमा झालेल्या वस्तू मोटर्स ऑफ अंधेरी युवकांच्या समितीमार्फत आदिवासींपर्यंत पोहोचवल्या जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com