उरणमध्ये शिवसेनेला जोरदार हादरा

उरण : ग्रामपंचायत सदस्‍यांचा महेश बालदी यांच्या उपस्‍थितीत पक्ष्र प्रवेश.
उरण : ग्रामपंचायत सदस्‍यांचा महेश बालदी यांच्या उपस्‍थितीत पक्ष्र प्रवेश.

 उरण : जेएनपीटीचे विश्‍वस्त महेश बालदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. उरण तालुक्‍यात शिवसेनेने सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू केले असून, जसखार गावातील भाजप ग्रामपंचायतीच्या सदस्या योगिता अमित ठाकूर यांचा रविवारी (ता.६) आमदार मनोहर भोईर यांनी आपल्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करून घेतला; मात्र या घटनेला २४ तासही उलटून गेले नाहीत, तोच जसखार गावच्या भाजप ग्रामपंचायत सदस्या योगिता ठाकूर व त्यांचे पती अमित ठाकूर यांनी आपले कुटुंबीय तसेच कार्यकर्त्यांसह अवघ्या २४ तासांच्या आत पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करून भाजपचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला. त्यांच्यासोबत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख नितीन ठाकूर यांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करून शिवसेनेला हादरा दिला आहे. या वेळी महेश बालदी मित्र मंडळाने त्यांचे जोरदार स्वागत केले.

या वेळी महेश बालदी यांनी सांगितले की, सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचा विश्‍वास या बळावर उरण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी उरण विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. याचा धसका शेकाप आघाडीचे उमेदवार विवेक पाटील यांनी घेऊन माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. तसेच पायाखालची वाळू सरकू लागलेल्या शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर यांनी भाजपमध्ये सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे; मात्र भाजपचा पदाधिकारी कार्यकर्ता हा निष्ठावंत आहे. हे जसखार ग्रामपंचायतीच्या सदस्या योगिता ठाकूर यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी त्यांच्यासोबत भाजपमध्ये घरवापसी करताना शिवसेनेचा पदाधिकारी आपल्यासोबत आणला आहे. त्या पदाधिकाऱ्यांचा भाजपचा कार्यकर्ता योग्य तो सन्मान करणार, असा विश्‍वास महेश बालदी यांनी  व्यक्त केला. 
या वेळी जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच दामूशेठ घरत, सोनारी गावचे माजी सरपंच तथा भाजप महालण विभागाचे अध्यक्ष महेश कडू, भाजपचे तालुका सरचिटणीस सुनील पाटील, दिनेश तांडेल, कामगार नेते सुधीर घरत, युवा नेते देवेंद्र म्हात्रेंसह जसखार ग्रामपंचायतीचे सदस्य, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com