धक्कादायक! व्हॅनचे रुग्णवाहिकेत रुपांतर करुन अवैध मद्य वाहतूकीचा प्रयत्न!

धक्कादायक! व्हॅनचे रुग्णवाहिकेत रुपांतर करुन अवैध मद्य वाहतूकीचा प्रयत्न!

मुंबई: रुग्णवाहिकेतून मुंबईत मद्य नेण्याचा प्रयत्न केलेल्यास नालासोपारात अटक करण्यात आली. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी हे घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

मारुती व्हॅनचे रुग्णवाहिकेत रुपांतर करण्यात आले होते आणि त्यातून सव्वातीन लाखाचे मद्य जप्त करण्यात आले. मुंबईतील व्यक्तीकडे आपण हा साठा घेऊन जात असल्याचा दावा रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने केला.

पालघर जिल्ह्यात अवैध मद्याचा साठा जप्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच वसईत एका कारमधून 4.30 लाख रुपये किमतीचा मद्य साठा जप्त झाला होता. तर वसईतच 33 हजाराचे मद्य नेणाऱ्या मोटरसाकयल स्वारास ताब्यात घेतले आहे. त्याने हे मद्य आपण अवैधरीत्या खरेदी केल्याचे मान्य केले, पण ते स्वतःसाठी नेत असल्यादावा केला होता. 

मद्यविक्रीवर मुंबई महानगर क्षेत्रात पूर्ण बंदी आहे. ऑनलाईन मद्यविक्री शुक्रवारपासून राज्यातील बहुतांश भागात सुरु होईल, पण त्यास मुंबई परिसरात बंदीच घालण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com