10 वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, मुलाला बसला धक्का 

corona_test
corona_test
Updated on

पनवेल ः कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 30 वर्षीय रुग्ण कळंबोलितील देवांशी इन हॉटेलमध्ये तयार केलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. या रुग्णाला पालिकेकडून आलेल्या फोनमध्ये त्याच्या वडिलांना ही कोरोना झाल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून तरुणाला धक्काच बसला. कारण त्याच्या वडिलांचे दहा वर्षापुर्वीच निधन झाले आहे. तरुणाने स्वतःला सावरत फोन करणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रतिप्रश्‍न केला की, तुम्ही 10 वर्षापुर्वी वारलेल्या माझ्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट घेण्यासाठी स्वर्गात गेला होता का ? 

पनवेल पालिका हद्दीत राहणाऱ्या एका 30 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली असल्याने कळंबोली येथील देवांशी इन या हॉटेल मध्ये तयार करण्यात आलेल्या कोव्हिड रुग्णालयात त्याच्यावर 24 जुलै पासून उपचार सुरु आहेत. उपचारासाठी दाखल रुग्णाच्या नातेवाईकांच्या व रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्याच्या व अहवाल आल्या नंतर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला कॉलद्वारे निरोप देऊन त्यांची व्यवस्था इतर रुग्णालयात करण्यासाठी पालिकेमार्फत एक विशेष विभाग तयार करण्यात आला आहे. या विभागावर दररोज प्राप्त होणाऱ्या अहवालातून नव्याने कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाला संपर्क करण्याचे काम देखील सोपवण्यात आले आहे.

मंगळवारी (ता.29) देखील विभागातील कर्मचाऱ्यांना नव्याने कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची नाव तसेच संपर्क क्रमांक असलेली यादी प्राप्त झाल्याने यादी नुसार कॉल करणाऱ्या कर्मचाऱ्याने देवांशी इन येथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाला फोन करून त्याच्या वडिलांनाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. 
या बाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, उपचारासाठी दाखल असलेल्या युवकाने कामोठे येथील एका खाजगी प्रयोग शाळेत चाचणी केली. प्रयोगशाळेकडून रुग्णांचा अहवाल आल्या नंतर दोन दिवसानंतर आरोग्य विभागाला अहवाल पाठवला जातो. खाजगी प्रयोग शाळेत रुग्णाच्या नावा ऐवजी फक्त त्याच्या वडिलांच्या नावाची नोंद झाल्याने प्रयोग शाळेकडून प्राप्त यादीत केवळ रुग्णाच्या वडिलांचे नाव छापले गेल्याने ही सर्व गफलत झाली. छपाई मधील त्रुटी ही चुक झाल्याने त्यांनी मान्य केले. 

shocking The corona report of a father who died a 10 years ago came back positive

(संपादन ः रोशन मोरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com