
Palghar Crime
-सुमित पाटील
बोईसर : चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी हट्ट केल्याने आईने तिच्या दोन मुलांना लाटण्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत सात वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना पालघर काशीपाडा परिसरात घडली आहे. चिन्मय धुमडे असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.