Mumbai Local Crime : रेल्वे पोलिसाला लोकलसमोर ढकलले; वाशी रेल्वे पोलिसांकडून दोघा मारेकऱ्यांचा शोध सुरू
Railway Policeman Pushed Under Local Train In Navi Mumbai : पनवेल रेल्वे पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस हवालदाराची हत्या करून त्याला रबाळे ते घणसोली दरम्यान धावत्या लोकलसमोर ढकलण्याची धक्कादायक घटना घडली आहे. मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.
नवी मुंबई : पनवेल रेल्वे पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस हवालदाराची हत्या करून रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलसमोर ढकलल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे घडली. या प्रकरणातील दोघा मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.