
Bandra Railway Station Women Assaulted News: महाराष्ट्रातील महिला अत्याचारांच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीएत. त्यात आता आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली आहे. हरिद्वार येथून मुंबई आलेल्या एका महिलेवर चक्क रेल्वेच्या कोचमध्येच बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला शोधून काढलं असून अटकही केली आहे. शनिवारी ही घटना घडली होती.