हळदीच्या कार्यक्रमातून अचानक बाहेर गेला, घरी परतलाच नाही; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? कर्जतमधील धक्कादायक घटना

Karjat Crime: कर्जत तालुक्यातील नेवाळी गावात एका 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या तरुणाचा मृतदेह गावातील बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर आढळून आला.
Karjat Crime

Karjat Crime

ESakal

Updated on: 

रायगड जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जत तालुक्यातील नेवाळी गावात एका 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या तरुणाचा मृतदेह गावातील बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर आढळून आला. विशेष म्हणजे, तरुणाच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर खुणा होत्या. तसेच त्याचा चेहरा ॲसिड टाकून विद्रूप करण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...