दिवाळीपर्यंत स्थिती न सुधारल्यास दुकाने बंद होण्याची भीती; येथील व्यवसायावर ६० ते ७० टक्के परिणाम

दीपक घरत
Thursday, 3 September 2020

लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती ढासळलेल्या ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याने शहरातील किरकोळ व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर जवळपास ६० ते ७० टक्‍क्‍यांचा परिणाम झाला आहे. दीपावलीपर्यंत परिस्थिती न सुधारल्यास अनेक व्यावसायिकांना आपले व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती कळंबोली व्यापारी असोसिएशनचे सचिव कमल कोठारी यांनी व्यक्त केली आहे. 

पनवेल : लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती ढासळलेल्या ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याने शहरातील किरकोळ व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर जवळपास ६० ते ७० टक्‍क्‍यांचा परिणाम झाला आहे. दीपावलीपर्यंत परिस्थिती न सुधारल्यास अनेक व्यावसायिकांना आपले व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती कळंबोली व्यापारी असोसिएशनचे सचिव कमल कोठारी यांनी व्यक्त केली आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यात पालिका हद्दीतील व्यावसायिक आस्थापने बंद ठेवण्याच्या सूचनाही होत्या.त्‍यामुळे पाच महिन्यांपासून अनेक व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीचा फटका सहन करावा लागला आहे. अनलॉक दरम्यान बंद केलेली दुकाने पुन्हा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याने व्यवसायांना ग्राहकांचा पाठिंबा मिळेल, या अपेक्षेत दुकानदार होते. मात्र, सध्या तरी त्‍यांचा भ्रमनिरास झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा : रियाचा द्वेष पाहून फार वाईट वाटतेय... विद्या बालनने घेतली रियाची बाजू

कामगार वर्गांच्या आस्थापनांकडून पगारच मिळत नसल्याने ग्राहक आर्थिक संकटात आहेत. त्‍यामुळे ग्राहक जीवनावश्‍यक वस्तू वगळता इतर खरेदी करत नाहीत. त्‍यामुळे येथील व्यवसायावर ६० ते ७० टक्के परिणाम झाला आहे.

काळजी घ्या! : मुंबईत मलेरियाचा कहर, वाढत्या रुग्णांसह दोघांचा मृत्यू

हॉटेलही अडचणीत
अनलॉक जाहीर होऊनही खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हॉटेल्सना सुरू करण्याची परवानगी नाही. केवळ पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी असलेल्यांच्या व्यवसायावर जवळपास 80 टक्के परिणाम झाल्याची माहिती साई तीर्थ या हॉटेलचे सदानंद शेट्टी यांनी दिली. सरसकट हॉटेल्स सुरू होतील, तेव्हा कामगारांची कमतरता भासू नये, यासाठी कर्मचाऱ्यांना पूर्ण पगारही देत आहेत.

अधिक वाचा : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव; वर्षा येथे झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय 

ट्रॅव्हल्स ग्राहकांच्या प्रतीक्षेत
अनलॉक दरम्यान खासगी बसेस सुरू करण्यास परवानगी मिळेल, या अपेक्षेत असलेल्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचा सध्या तरी भ्रमनिरास झाला आहे. व्यवसाय बंद असल्याने तिकीट बुकिंग करणाऱ्या जवळपास १५० च्या आसपास व्यावसायिकांवर आर्थिक संकट आल्याची माहिती ओम नमः शिवाय ट्रॅव्हल्सचे अशोक गुरमे यांनी दिली आहे.

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shopkeeper in Depression, no business during lockdown