esakal | शॉक लागून तळोजा येथील तोंडरे गावातील दुकानदाराचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

शॉक लागून तळोजा येथील तोंडरे गावातील दुकानदाराचा मृत्यू 

दुकानाच्या लोखंडी दरवाजाला हात लावताच त्याला विजेचा शॉक लागला.

शॉक लागून तळोजा येथील तोंडरे गावातील दुकानदाराचा मृत्यू 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : तळोजा येथील तोंडरे गावातील दुकानदाराला दुकानावरील लोखंडी पत्रा व दरवाजामध्ये उतरलेल्या विजेचा शॉक लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 4) सकाळी घडली. तळोजा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

या दुर्घटनेत मृत पावलेला दुकानदार सुरेंद्र परमार (20) हा मूळचा राजस्थान राज्यातील असून सध्या तो तळोजा येथील तोंडरे गावात राहण्यास होता. तसेच तो त्याच भागात किराणा दुकान चालवत होता.

दरम्यान,मागील चार दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे मंगळवारी रात्री सुरेंद्र परमार याच्या दुकानातील विजेच्या मीटरमधून येणारी वायर तुटून सदर वायरमधील वीजप्रवाह दुकानावरील लोखंडी पत्र्यामध्ये तसेच लोखंडी दरवाजामध्ये उतरला. दरम्यान, बुधवारी सकाळी सुरेंद्र परमार हा नेहमीप्रमाणे आपले दुकान उघडण्यासाठी गेला असताना, दुकानाच्या लोखंडी दरवाजाला हात लावताच त्याला विजेचा शॉक लागला. त्यामुळे त्याला तत्काळ कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. 

loading image
go to top