गुडविन ज्वेलर्सचा लोकांच्या पैशावर डल्ला ? PMC नंतर आता आणखी एक मोठा घोटाळा ?

प्रशांत बारसिंग
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

गुडविन ज्वेलर्सची मुंबईतील ठाणे आणि डोंबिवली भागातील दुकानं बंद आहेत. त्यामुळे गुडविन ज्वेलर्सने लोकांनी भिशी स्वरूपात गुंतवलेल्या पैशांवर डल्ला मारलाय अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्यात.   

PMC बँक घोटाळ्यानंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठा घोटाळा समोर येतोय. गुडविन ज्वेलर्सची मुंबईतील ठाणे आणि डोंबिवली भागातील दुकानं बंद आहेत. त्यामुळे गुडविन ज्वेलर्सने लोकांनी भिशी स्वरूपात गुंतवलेल्या पैशांवर डल्ला मारलाय अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्यात.   

डोंबिवलीकरांना तब्बल 10 कोटींचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली. डोंबिवलीकरांनी गुंतवणूक केलेले कोट्यवधी रुपये घेऊन गुडविन ज्वेलर्स पसार झाल्याचं समोर आलं. या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केलाय.

आणखी बातम्या वाचा 

देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल कोश्यारींची भेट; सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेची धावपळ

Video : 'ब्ल्यू डायमंड'च्या पाना फुलांनी सजला विठ्ठल-रूक्मिणीचा गाभारा..

 

दरम्यान, डोंबिवलीच्या घटनेनंतर ठाण्यातील चरई भागात डॉ मुस रोडवर असलेलं गुडविन ज्वेलर्स दुकानदेखील अचानक बंद झाल्यामुळे अनेकांनी याही ठिकाणी मोठी गर्दी केलीये. तब्बल 80 जणांनी ठाण्यातल्या या गुडविनच्या दुकानात भिशी स्वरूपात पैसे गुंतवलेत. या सर्वांनी ठाण्यातील गुडविन दुकानाबाहेर मोठी गर्दी केलीये. 

आम्ही पळून गेलो नाही

दरम्यान आम्ही पळून गेलो नाही. आम्हाला संपवण्याकरता एक मोठी शक्ती काम करतेय. आमच्याकडे 50 कोटींची खंडणी मागण्यात आलीय. असं सांगत गुडविल ज्वेलर्सच्या मालकांनी आपली बाजू मांडण्यारा एक व्हिडिओ जारी केलाय.

कुणी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक केलीये तर, कुणी घरासाठी पैसे साठवलेले. मात्र, आता या सर्वांवर पैसे बुडण्याची वेळ येतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीये.

Webtitle : shops of goodwin jewellers closed in mumbai yet another scam suspected by bhisi investors  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shops of goodwin jewellers closed in mumbai yet another scam suspected by bhisi investors