नोकरीचे आमिष दाखवून ८ लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

सानपाडा पोलिसांनी या टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : कॅनडा देशात सुपरवायझरपदाची नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून एका टोळीने सानपाडा भागात राहणाऱ्या व्यक्तीला तब्बल ७ लाख ९१ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सानपाडा पोलिसांनी या टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कृष्णराव शिंदेला एका अज्ञाताने कॅनडातील कंपनीचा मॅनेजर असल्याचे सांगून त्याची सुपरवायझर पदासाठी निवड  झाल्याचे सांगितले.त्यानंतर भारतीय एजंट अमीना बोमन इरानी हिच्यामार्फत व्हिजा, मेडिकल इन्शुरन्स, वर्क परमिट, टॅक्‍स अशा कारणांसाठी महिन्याभरातच तब्बल ७ लाख ९१ हजारांची रक्कम उकळली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: By showing the bait of the job guy got looted