श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी तुंगारेश्वर, निर्मळ मंदिर बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tungareshwar-Temple

श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी तुंगारेश्वर, निर्मळ मंदिर बंद

विरार: श्रावण महिना सुरु झाला कि व्रतवैकल्य हि सुरु होतात या महिन्यात हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर सण येतात. तर दुसऱ्या बाजूला तालुक्यातील धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुंगारेश्वर आणि निर्मळ येथील शंकराच्या मंदिरात सोमवार आणि शनिवारी मोठी गर्दी होत असते. परंतु कोरोना मुळे लागोपाठ दुसऱ्या वर्षीही मंदिरे बंद असल्याने भाविकांना घरूनच पूजाआर्चना करावी लागत आहे. तर तरुणाईचा ही मोठा हिरमोड झाला. त्यांना पर्यटनाचा आनंद घेता आला नाही.

वसई तालुक्यातील प्रसिध्द तुंगारेश्वर मंदिर आज श्रावणी सोमवार निमित्त बंद आहे. पावसाळा सुरु झाला कि पर्यटकआणि तरुणाईची पावले आपोआप पडतात ती तुंगारेश्वरला या ठिकाणी पडणारा पाऊस, पावसामुळे तयार होणारे छोटे छोटे धबधबे आणि बहरला हिरवागार निसर्ग याचा आनंद घेण्या बरोबरच या ठिकाणच्या अरण्यात असलेल्या माहादेवाचे दर्शन असा पूर्ण प्लॅन पर्यटकांचा असतो. आज श्रावण सोमवारनिमित्त वसईच्या तुंगारेश्वर मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. भक्तांची अलोट गर्दी यावेळी असते. मात्र कोरोनाच्या निर्बंधामुळे यंदा प्रशासनाने मंदिर बंद केलं आहे.

मंदिराच्या दोन किमी दूरवरच मुख्य प्रवेशद्वाराजवळ भक्तांना पोलीस अडवत आहेत. प्रत्येकाची चौकशी करत आहेत. त्यामुळे भाविकांचा हिरमोड होत आहे. तुंगारेश्वरला पावसाळ्यात पर्यटनाबरोबर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. परंतु, मंदिर तुंगारेश्वर येथे पहाटे महादेवाला पुजाऱ्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. तर प्रसिद्ध निर्मळ येथील मंदिरही बंद आहे या मंदिरात शनिवार आणि सोमवारी भाविकांची गर्दी होत असते. आज पहाटे मंदिरात ट्रस्टचे सल्लागार प्रशांत नाईक व त्यांची पत्नी राजेश्री नाईक यांच्या हस्ते शंकराच्या पिंडीला अभिषेक करण्यात आला