धारावी शून्याकडे पण मुंबईच्या ९ वॉर्ड्सची परिस्थिती चिंतेची

धारावी शून्याकडे पण मुंबईच्या ९ वॉर्ड्सची परिस्थिती चिंतेची अंधेरी पश्चिम (K West Ward) मध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण Dharavi becoming corona free but 9 wards of Mumbai are still sensitive of Covid 19 vjb 91
Dharavi Corona
Dharavi CoronaGoogle

अंधेरी पश्चिम (K West Ward) मध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण

मुंबई: शहरात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. मात्र, अजूनही असे काही वॉर्ड्स आहेत, जिथे रुग्णसंख्या जास्त असून सक्रिय रुग्ण वाढत आहेत. मुंबईतील 24 वॉर्ड्सपैकी जवळपास 9 वॉर्डमध्ये एकूण रुग्णांच्या 54 टक्के रुग्णांची नोंद केली गेली आहे. दरम्यान, धारावीसारख्या झोपडपट्टी परिसरात सक्रिय रुग्णांची संख्या घटली असून सद्यस्थितीत फक्त 35 सक्रिय रुग्ण आहेत. निर्बंध शिथील झाल्यानंतर किमान 28 दिवस मुंबईकरांची परीक्षा असून वाढत राहणारी गर्दी व लोकल सेवा यामुळे काय होते? याचा प्रश्न उपस्थित होणार आहे.

Dharavi Corona
ED अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाला समन्स बजावण्याच्या तयारीत

पालिकेच्या डॅशबोर्डनुसार, मुंबईतील एकूण 4,196 सक्रिय कोविड -19 रुग्णांपैकी 2,267 सक्रिय रुग्ण उत्तर मुंबईतील नऊ वॉर्डमधील आहेत. अंधेरी पश्चिम, बोरिवली पश्चिम, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे पश्चिम, मुलुंड, उत्तर मुंबईतील भांडुप आणि दक्षिण मुंबईतील मलबार हिल हे प्रभाग आहेत जिथे प्रत्येकी 200 पेक्षा जास्त सक्रिय कोविड -19 रुग्ण आहेत.

Dharavi Corona
'तुम्हाला कोणी हटवणार नाही', राज ठाकरेंचा मच्छीमार आणि पोलिसांच्या कुटुंबीयांना शब्द

सर्वाधिक सक्रिय रुग्ण के पश्चिम वॉर्डमधील अंधेरी पश्चिम येथे नोंदले गेले आहे. सध्या 328 सक्रिय रुग्ण अंधेरी या परिसरात आहेत. त्यानंतर कांदिवली पश्चिमशी संबंधित आर-दक्षिण वॉर्डमध्ये 303  आणि बोरिवली पश्चिमशी संबंधित आर-मध्य वॉर्डमध्ये 286 सक्रिय रुग्ण नोंदले गेले आहेत.  तर, सर्वात कमी सक्रिय रुग्ण बी वॉर्डमध्ये 8 नोंदले गेले आहेत. डोंगरी आणि पायधुनी या भागांचा यात समावेश आहे. त्यापाठोपाठ गिरगाव आणि मरीन लाईन्स हे परिसर येणाऱ्या सी वॉर्डमध्ये 38 सक्रिय रुग्ण आहेत. जी दक्षिण वॉर्डमध्ये आता 103 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.

Dharavi Corona
तुम्ही मंत्रालयात येण्यासाठी याचिका करु की, आंदोलन? मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

दरम्यान, सध्या शहरातील 17 वॉर्ड्समधील रुग्ण वाढीचा दर मुंबईच्या एकूण कोविड -19 रुग्णांच्या सरासरी वाढीच्या दरापेक्षा जास्त असून 0.04% एवढा आहे. बी वॉर्डचा सर्वात कमी रुग्ण वाढीचा दर 0.01%आहे, तर चर्चगेट, कुलाबा आणि कफ परेड असे परिसर येणाऱ्या दक्षिण मुंबईतील ए वॉर्डमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढीचा दर असून 0.07% एवढा आहे. सात दिवसांमध्ये कोविड -19 रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे वाढीचा दर मोजला जातो. ए वॉर्डमध्ये सध्या एकूण 144 सक्रिय रुग्ण आहेत.

Dharavi Corona
'त्या' लोकांना कोरोना संपेपर्यंत लोकल प्रवासाची परवानगी नाहीच!

पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील एक वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार,  “दुसऱ्या लाटेदरम्यान एक सामान्य कल म्हणून असे पाहिले आहे की मुंबईच्या उपनगरीय इमारतींमधून अधिक रुग्ण प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षी पहिल्या लाटेच्या तुलनेत झोपडपट्ट्यांमध्ये अधिक रुग्णसंख्या दिसून आली होती."

दरम्यान, के पश्चिम (328), आर दक्षिण (303), आर सी (286), पी उत्तर (221), डी (265), एस (204), एस पश्चिम (250), टी (208), के पूर्व (202) या 9 वॉर्डमध्ये सक्रिय रुग्ण अधिक असून त्यांची बेरीज 4,196 इतकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com