Mumbai Local: कल्याण-सीएसएमटी लोकल १५ डब्यांच्या करा, श्रीकांत शिंदे यांची मागणी

Shrikant Shinde: मध्य रेल्वेवरील वाढती गर्दी कमी करण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी कल्याण-सीएसएमटी लोकल १५ डब्यांच्या करा, अशी मागणी केली आहे.
Mumbai Local

Mumbai Local

ESakal

Updated on

डोंबिवली : मध्य रेल्वेवरील वाढती गर्दी आणि प्रवाशांवर पडणारा ताण लक्षात घेता कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या मार्गावरील सर्व लोकल गाड्या १५ डब्यांच्या करण्यात याव्यात, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केली. यासोबतच रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com