सिद्धांत गणोरे याचा जामिनासाठी अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

मुंबई - आईची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सिद्धांत गणोरे या तरुणाने मानसिक संतुलन बिघडले आहे, असे सांगून मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर 5 जूनला सुनावणी होणार आहे. 

मुंबई - आईची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सिद्धांत गणोरे या तरुणाने मानसिक संतुलन बिघडले आहे, असे सांगून मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर 5 जूनला सुनावणी होणार आहे. 

वाकोलामध्ये राहणाऱ्या एकवीस वर्षीय सिद्धांतने गेल्या वर्षी (23 मे) आई दीपाली हिच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली होती. त्याचे वडील पोलिस सेवेत आहेत. घटनेच्या रात्री ते घरी आल्यावर हत्येचा प्रकार उघड झाला. सिद्धांतने मृतदेहाजवळच चिठ्ठी ठेवली होती. त्यामध्ये आईला कंटाळून हत्या केली, मला पकडा आणि शिक्षा करा, असा मजकूर लिहिला होता.  पोलिसांनी त्याला राजस्थानमधील एका हॉटेलमधून अटक केली होती. 

वर्षभरापासून तो कारागृहात आहे. त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे, त्यामुळे फौजदारी दंड संहितेच्या कलम 330 नुसार जामीन द्यावा, अशी मागणी करणारा अर्ज सत्र न्यायालयात केला होता. न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाद्वारे त्याची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी मानसिक स्थिती बिघडलेली नाही, असा अहवाल तज्ज्ञांनी दिला. त्यामुळे त्याचा जामीन नामंजूर करण्यात आला. उच्च न्यायालयात केलेल्या जामीन अर्जातही मानसिक स्थितीचे कारण देण्यात आले आहे.

Web Title: siddhant ganore application for bail