सिध्देश्‍वर, उद्यान एक्‍स्प्रेस रद्द; तर काही रेल्वे तात्पुरत्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

तात्पुरत्या रद्द केलेल्या रेल्वे

हैदराबाद-मुंबई, चेन्नई-मुंबई, लोकमान्य टिळक टर्मिनल (एलटीटी)-विशाखापट्टणम, कोईमतूर-एलटीटी, बेंगलोर-मुंबई (उद्यान एक्‍स्प्रेस), सिध्देश्‍वर एक्‍स्प्रेस पुण्यापर्यंतच धावणार आहेत. तर सोलापूर-मुंबई, नागरकोईल-मुंबई रेल्वे गाड्या दौण्डपर्यंतच धावणार आहेत.

सोलापूर : दोन दिवसांपासून मुंबईसह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून, रुळांवर पाणीच पाणी झाल्याने सोलापूर-मुंबई (सिध्देश्‍वर एक्‍स्प्रेस), मुंबई-बेंगलोर (उद्यान एक्‍स्प्रेस) यासह बिदर-मुंबई, मुंबई-बिदर, मुंबई-पंढरपूर, पंढरपूर-मुंबई, हैदराबाद-मुंबई एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर 20 हून अधिक रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या असून, 13 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

रेल्वे रुळावर पाणी साचल्याने आणि काही ठिकाणी दरड कोसळल्याने रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. रुळावरील पाणी ओसरल्यानंतर रुळाची परिस्थिती पाहून पुढील आदेश दिले जाणार आहेत. काही ठिकाणी पाण्यामुळे रेल्वे रुळ खचल्याने पुढील काही दिवस रेल्वेचे वेळापत्रक वरीलप्रमाणे कायम राहील, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

तात्पुरत्या रद्द केलेल्या रेल्वे

हैदराबाद-मुंबई, चेन्नई-मुंबई, लोकमान्य टिळक टर्मिनल (एलटीटी)-विशाखापट्टणम, कोईमतूर-एलटीटी, बेंगलोर-मुंबई (उद्यान एक्‍स्प्रेस), सिध्देश्‍वर एक्‍स्प्रेस पुण्यापर्यंतच धावणार आहेत. तर सोलापूर-मुंबई, नागरकोईल-मुंबई रेल्वे गाड्या दौण्डपर्यंतच धावणार आहेत.

तसेच मुंबई-बेंगलोर उद्यान एक्‍स्प्रेस मुंबईऐवजी सोलापूर स्थानकावरुन तर एलटीटी-विशाखापट्टणम एक्‍स्प्रेस पुण्यातून सुटणार आहे. मुंबई-कन्याकुमारी व मुंबई-नागरकोईल एक्‍स्प्रेस मनमाड, औरंगाबाद, परभणी, बिदर, कलबुर्गीमार्गे धावेल. एलटीटी-कोईमतूर, मुंबई-बेंगलोर हुसेनसागर एक्‍स्प्रेस, मुंबई-बिदर, बारमेर-यशवंतपूर, मुंबई-सोलापूर, मुंबई-विजापूर फास्ट पॅसेंजर, मुंबई-चेन्नई एक्‍स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्‍स्प्रेस या रेल्वे गाड्या कल्याण, इगतपुरी, मनमाड, दौण्डमार्गे धावणार आहेत. 

या रेल्वे गाड्यांचे बदलले मार्ग 

दादर-चेन्नई, एलटीटी-कराईल, अजमेर-म्हैसूर, दादर-पौण्डेचारी, कोईमतूर-राजकोट, यशवंतपूर-बिकानेर, अहमदाबाद-चेन्नई, मुंबई-भुवनेश्‍वर, मुंबई-हैदराबाद हुसनेसागर एक्‍स्प्रेस, मुंबई-चेन्नई मेल एक्‍स्प्रेस, मुंबई-बिदर, यशवंतपूर-अजमेर या रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddheshwar Udyan Express Canceled