
Siddhivinayak Temple
ESakal
प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर आता आधुनिक आणि सुरक्षित होणार आहे. वाढत्या भक्तसंख्येचा विचार करून मंदिर परिसरातील सुविधा अधिक सुकर आणि सुरक्षित करण्यासाठी महापालिकेकडून सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधा उभारणीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पावर तब्बल ७८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पहिल्या टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील दोन वर्षांत हा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.