सिद्धिविनायक मंदिर न्यास करणार तीवरे गावचं पुनर्वसन

सिद्धिविनायक मंदिर न्यास करणार तीवरे गावचं पुनर्वसन

मुंबई : रत्नागिरीतील तीवरे धरणग्रस्तांच्या मदतीसाठी सिद्धिविनायक मंदिर न्यास पुढे आलं असून संपूर्ण गावाचं पुनर्वसन करण्याचा निर्णय मंदिर न्यासने घेतला आहे. आज पार पजलेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळुण तालुक्यातील तीवरे धरण फटून तीवरे गावातील अनेक घरं दूर्घटनाग्रस्तं झाली. अनेकांचे संसार उद्धवस्तं झाले. आता याच गावातील दूर्घटनेत उद्धवस्तं  झालेल्यांचे संसार सिद्धीविनायक मंदिर न्यास उभारणार आहे.

तीवरे गावात ज्यांची घरं पडली त्यांची घरं पुन्हा नव्याने बांधूण देण्यात येणार असून गृहउपयोगी वस्तू देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इतकच नाही तर तीवरे गावातील शाळा देखील सिद्धीविनायक मंदिर न्यास बांधून देणार आहे. आमदार उदय सामंत यांनी मंदिर न्यासकडे याबाबतची मागणी केली होती.

यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे धरण फूटीने आभाळ कोसळलेल्या तीवरे ग्रामस्थांना सिद्धिविनायक मंदिर न्यासमुळे मोठा आधार मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com