भयंकर ! वर्क फ्रॉम होमचे दुष्परिणाम, मणक्यातून काढला 3.5 सेंमीचा ट्यूमर..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

लॉकडाऊनमुळे सध्या अनेक लोक एकीकडे वर्क फ्रॉम होम करण्यात यशस्वी होत असताना दुसरीकडे मात्र शारीरिक आजारातही भर पडत आहे

मुंबई : लॉकडाऊनमुळे सध्या अनेक लोक एकीकडे वर्क फ्रॉम होम करण्यात यशस्वी होत असताना दुसरीकडे मात्र शारीरिक आजारातही भर पडत आहे. बराच वेळ एकाच ठिकाणी बसून सतत काम करावे लागत असल्याने पाठदुखीची समस्या बळावू लागलीय. याचा प्रत्यय नुकताच आलायं. लॉकडाऊनच्या या कालावधीत अधिकतास बसून काम करावे लागत असल्याने मुंबईतील एका व्यक्तीच्या मणक्यात गाठ तयार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबईतील एका 40 वर्षीय व्यक्तीच्या पाठीच्या मणक्यातून 3.5 सेंटिमीटरचा ट्यूमर (गाठ) काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. हा रूग्ण कित्येक महिने पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता. मीरारोड येथील वोक्हार्ड रूग्णालयात ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

मोठी बातमी - नवी मुंबईत एक आठवडा पुन्हा एकदा कडकडीत लॉकडाऊन

भूपेश अंकोलेकर (40) असे या रूग्णाचे नाव असून ते मुंबईत राहणारे आहेत. ही व्यक्ती व्यवसायाने अभियंता आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे अनेक महिन्यांपासून त्यांना पाठदुखीची समस्या जाणवत होती. मात्र, लॉकडाऊनमध्ये घरीच बसून काम करावे लागत असल्याने पाठीचे दुखणे अधिकच वाढू लागले. दुखणं असह्य झाल्याने कुटुंबियांनी त्यांना मे च्या पहिल्या आठवड्यात वोक्हार्ट रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

पाठीच्या दुखण्याचे कारण जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा एक्स-रे आणि एमआरआय चाचणी करण्यात आली. या वैद्यकीय तपासणीत या व्यक्तीच्या पाठीच्या कण्यात गाठ असल्याचं निदान झालं. ही गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढणे गरजेचं होते. त्यानुसार, कुटुंबियांच्या परवानगीनुसार डॉक्टरांनी दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया करून पाठीच्या मणक्यातून गाठ काढली. ही गाठ 3.5 सेंटिमीटर इतकी मोठी होती.

मोठी बातमी - कोरोनाने मृत्यू ओढवलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना पंधरा कोटी दहा लाख रुपयांचे वाटप

पाठीच्या कण्यातील ही गाठ हाडाच्या आत चिटकून होती. मज्जातंतूला नुकसान होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे खूपच अवघड होतं. परंतु, डॉक्टरांनी हे आव्हान स्विकारून मायक्रोस्क्रोपीद्वारे (दुर्बिणी) प्रक्रिया करून पाठीच्या मणक्यातील ही गाठ यशस्वीरित्या गाठली. या शस्त्रक्रियेमुळे रूग्णाला पाठीच्या दुखण्यातून कायमस्वरूपी सुटका मिळाली आहे. - डॉ. गिरीश भालेराव , तज्ज्ञ सल्लागार आणि ऑर्थोपेडिक सर्जन 

पाठीच्या कण्यातून गाठ काढणे ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते. साधारणतः चार तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. या शस्त्रक्रियेनुसार रूग्ण शुद्धीवर आल्यावर कुठल्याही प्रकारची वेदना जाणवत नाही. दोन तासांनंतर तो दैनंदिन आयुष्य जगू शकतो. या रूग्णाला शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी घरी सोडण्यात आले आहे. आता या रूग्णाची प्रकृती ठणठणीत असून तो नियमित कामे करू लागला आहे. - डॉ. अश्विन बोरकर, कन्सल्टंट न्यूरोसर्जन

side effects of work from home mumbai doctor conducts surgery and removed tumor from back


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: side effects of work from home mumbai doctor conducts surgery and removed tumor from back