ठाण्याच्या सिग्नलवर गजरा विकणारी मुलं चालली 'इस्रो'त

ठाण्याच्या सिग्नलवर गजरा विकणारी मुलं चालली 'इस्रो'त

ठाणे  - अतुल पवार आणि किरण काळे, ठाण्याच्या तीन हात नाका सिग्नलवर ते गजरे त्याचबरोबर विविध वस्तू विकायचे. सिग्नल शाळेतच ते शिक्षण देखील घायचे. मागील वर्षी डोंबिवलीमध्ये राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्यांनी भाग घेतला होता. या विज्ञान प्रदर्शनात या दोघांनी मिळून समुद्राच्या खाऱ्या पाण्याला गोड्या पाण्यात रूपांतरित करायचा प्रयोग सादर केला होता. या  प्रयोगाचं सर्वांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केलं गेलं. थेट इस्रोने देखील या दोघांच्या प्रयोगाची दखक घेत त्यांचं कौतुक केलं होतं. 

तब्बल शंभरहून अधिक शाळांनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला होता. या विज्ञान प्रदर्शनात ठाण्यातील सिग्नल शाळेचा सातवा नंबर आलाय आणि रस्त्यावर गजरे विकणारे अतुल पवार आणि किरण काळे आता थेट इस्रोमध्ये जाणार आहेत. 

या विज्ञान प्रदर्शनात शंभरहून अधिक शाळांनी सहभाग नोंदवला होता. यातील पहिल्या दहामध्ये नंबर पटकावणाऱ्या शाळेतील प्रत्येकी दोन मुलांना इस्रोमध्ये जाण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. १३ ते १७ मार्चला हे विद्यार्थी इस्रोमध्ये अभ्यास मोहिमेवर जाणार आहेत. तीन दिवस हे विद्यार्थी इस्रोमध्येच राहून तिथली सर्व माहिती घेणार आहेत. दरम्यान इस्रोमध्ये जायला मिळणार सल्याने खूप आनंद होत असल्याचं या दोघांनी म्हटलंय.  

signal school boys will visit isro as study tour for three days  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com