Mumbai Traffic: धारावीतील द्रुतगती मार्गावरील सिग्नल बंद; चोवीस तास वाहने सुसाट, अपघाताची भीती
Signal Failure: धारावीतील दादू शंकर सदाफुले वीणेकरी बुवा चौक येथील सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतूक नियमन होत नाही. यामुळे लहान विद्यार्थी, महिलांना आणि अपंग व्यक्तींना अपघाताचा धोका वाढला आहे.
धारावी : सायन स्थानकाकडून मुंबई शहर व पश्चिम उपनगरांकडे धारावीतून जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील दादू शंकर सदाफुले वीणेकरी बुवा चौक येथील सिग्नल यंत्रणा बंद असल्याने रस्त्यावरून २४ तास वाहने न थांबता जलद गतीने जात आहेत.