esakal | राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसमध्ये वादाची चिन्हे NCP Congress
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसमध्ये वादाची चिन्हे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अतिवृष्टीने राज्यात काही जिल्ह्यांत शेती आणि अन्य बाबींचे प्रचंड नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याचे संकेत राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी बुधवारी दिले; मात्र, सर्व माहिती हाती आल्यानंतरच त्याबाबतचा निर्णय होईल. तूर्तास तशी तयारी नसल्याचे उपुमख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

त्यामुळे ओल्या दुष्काळाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसमध्येच वादाला सुरवात होण्याची चिन्हे आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी काही पक्षांकडून होत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. परंतु, प्रत्यक्ष नुकसानीची माहिती आल्याशिवाय ओला दुष्काळासंदर्भात निर्णय घेता येणार नसल्याचे पवार यांनी सांगितले. कोकण, पश्चिम महाराष्ट्रानंतर आता मराठावाडा, विदर्भात प्रचंड पाऊस झाल्याने सुमारे आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. या पार्श्वभूमीवर महिती घेऊन पुढील आठवड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करता येईल का, याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. पवार म्हणाले, "शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळतील का, याबाबत विमा कंपन्यांना आदेश दिला आहे. या काळात केंद्र सरकारने दुजाभाव करू नये. मदतीसाठी पैसे मागूनही केंद्र सरकार ते देत नाही. काही राज्यांना न मागता पैसे दिले जातात."

हेही वाचा: आरक्षणावर सरकार गंभीर नाही : चंद्रकांत पाटील;पाहा व्हिडिओ

राज्य सरकार पूरग्रस्तांना सर्व पातळ्यावर मदत करीत आहे. शेती आणि नुकसान झालेल्या इतर घटकांचे पंचनामे करून मदत जाहीर केली जाईल. पुराच्या संकटात सापडलेल्यांना राज्य सरकारसोबत केंद्र सरकारनेही मदत वे पाहिजे. मात्र, तसे होत नाही. सर्व पूरग्रस्तांना योग्य आणि वेळेत मदत मिळेल.

- विजय वडेट्टीवार, मदत व पुर्नवसन मंत्री

loading image
go to top