सिल्व्हर ओक हल्ला : 115 आरोपींची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव, २० एप्रिलला सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st employees at silver oak

सिल्व्हर ओक हल्ला : 115 आरोपींची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव, 20 एप्रिलला सुनावणी

मुंबई : राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या 115 जणांनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायायलात अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, यावर 20 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल केला होता. त्यानंतर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा: कोरोनाचा धोका वाढला! यूपीत सार्वजनिक जागी पुन्हा मास्क आनिवार्य

सदावर्तेंना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांनी घेतला आहे. तर इतर 115 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांनी दाखल केलेल्या जामिन अर्जावर 20 एप्रिल रोजी सुनावणी पार पडणार आहे. अटक करण्यात आलेल्या 115 आरोपींपैकी 24 महिलांचा समावेश आहे.

Web Title: Silver Oak Attack 115 Accused Run To Sessions Court For Bail Hearing On April 20

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top