esakal | मुंबईत आतापर्यंत इतक्या लाख नागरीकांनी घेतली लस

बोलून बातमी शोधा

कोरोना लस
मुंबईत आतापर्यंत इतक्या लाख नागरीकांनी घेतली लस
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कोरोनामुळे मुंबईत चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. सक्रीय रुग्णांची संख्याही मोठी आहे. कोरोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी सध्या तरी लसीकरण हा एकमेव मार्ग आहे. लसीकरण झाल्यानंतरही काही जणांना कोरोना संसर्गाची बाधा झालीय. पण सध्यातरी लसीकरण हाच कोरोनाची पुढची लाट थोपवण्याचा एकमेव मार्ग आहे. देशात जानेवारी महिन्यात लसीकरणाला सुरुवात झाली.

लसीकरण हा हर्ड इम्युनिटी निर्माण करण्याचा एक मार्ग आहे. देशात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर मुंबईत आतापर्यंत २० लाख नागरीकांचे लसीकरण झाले आहे. सोमवारी मुंबईत कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या २० लाख झाली. लसींच्या कमतरतेमुळे सलग दुसऱ्यादिवशी लस घेणाऱ्या नागरीकांची संख्या कमी होती. लसींचा साठाच उपलब्ध नसल्यामुळे सोमवारी ३१ खासगी केंद्रांना लसच देता आली नाही.

हेही वाचा: रेमडेसिव्हीरचा काळबाजार, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

सार्वजनिक रुग्णालयांनाही याचा फटका बसला. जुहूच्या आरएन कुपर हॉस्पिटलमध्ये पहिला डोस घेण्यासाठी येणाऱ्या नागरीकांचे लसीकरण केले जात होते. को-विन वर दुसऱ्या डोसची नोंदणी करतानाही मुंबईकरांना अडचणी येत होत्या. सोमवारी ३५ हजार ३०९ नागरीकांचे लसीकरण झाले. रविवारच्या तुलनेत हे प्रमाण थोडे जास्त आहे. रविवारी २७ हजार १८९ नागरीकांचे लसीकरण करण्यात आले.