esakal | मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उप परिसराचे उदघाटन; राज्यपाल म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

bhagat singh koshyari

मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उप परिसराचे उदघाटन; राज्यपाल म्हणाले...

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : विपूल नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात मुंबई विद्यापीठाचे (Mumbai university) नव्याने स्थापन होत असलेले हे उप परिसर हे एक आदर्श उप परिसर म्हणून उदयास येणार असल्याचा आशावाद राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh koshyari) यांनी केला. समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या जिल्ह्याच्या स्थानिक गरजा (Local needs) लक्षात घेऊन कौशल्याधारीत आणि व्यावसायाभिमूख अभ्यासक्रम विद्यापीठाने (university syllabus) तयार करावेत असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा: टाटा मेमोरियल रुग्णालयात रक्ताचा तीव्र तुटवडा; रक्तदानाचे एसबीटीसीचे आवाहन

मुंबई विद्यापीठाच्या नव्याने स्थापन झालेल्या सिंधुदुर्ग उप परिसराच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते. आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालक मंत्री सिंधुदुर्ग जिल्हा, उदय सामंत, खासदार, विनायक राऊत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड आदी होते. सिंधुदुर्ग जिल्हा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध जिल्हा असून निसर्गास आत्मसात करून जुळवून घेतल्यास आपुलकीची भावना तयार होणार असून ते अधिक महत्वाचे ठरणार असल्याचेही राज्यपालांनी सांगितले.

याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत म्हणाले की गेल्या अनेक वर्षांची सिंधुदुर्ग जिल्हा वासियांची मागणी या उप परिसराच्या माध्यमातून पूर्णत्वास येते आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण घटकांमुळे हे उप परिसर अनेकांगी रुपाने विकसित होणार आहे. सागरी अध्ययन क्षेत्रातील उद्योन्मुख गरजा लक्षात घेऊन तसेच उपलब्ध साधन सामुग्रीचा अभ्यास करून त्या धर्तीवर अभ्यासक्रम तयार करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लवकरच प्रीआयएएस केंद्र सुरू केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उदघाटन समारंभाचे प्रास्ताविक करताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर म्हणाले की, विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे उप परिसराची स्थापना होत असल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण पार्श्वभूमी, तेथील सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून या उप परिसरामध्ये दर्जेदार, कौशल्याधारीत आणि व्यावसायाभिमूख शैक्षणिक अभ्यासक्रम त्याचबरोबर उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सावंतवाडी नगर परिषदेच्या सहकार्याने हा उप परिसर या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

loading image
go to top