
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली : कल्याण शीळ रोडवरील तासन तास होणाऱ्या वाहन कोंडीवर सातत्याने ओरड होत आहे. एकीकडे या रस्त्याच्या मध्ये मेट्रोचे काम सुरु असून दुसरीकडे रस्त्याचे रुंदीकरण न झाल्याने मुख्यतः ही कोंडी होत आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर मेट्रोच्या कामाने गती पकडलेली दिसून येत आहे. मात्र वर्षानुवर्षे रखडलेले रुंदीकरणाचा प्रश्न काही मार्गी लागताना दिसत नाही. त्याविषयी कोणी बोलत ही नसल्याने वाहन चालक तसेच स्थानिक ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत.