सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करणारी CBI ची टीम परतली दिल्लीला, आता 'असा' होईल पुढील तपास

सुमित बागुल
Wednesday, 16 September 2020

आतापर्यंत CBI ने काय काय तपास केला, याचा अहवाल आता CBI च्या दिल्ली मुख्यालयाला सादर केला जाणार आहे.

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात राजकारण तापलं. केवळ मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण देशाचं राजकारण सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तापलेलं पाहायला मिळालं. मुंबईत पोलिसांनी याप्रकरणी FIR दाखल केला नाही. दरम्यान मुंबई पोलिस विरुद्ध बिहार पोलीस असा सामनाही रंगला. यानंतर याप्रकरणी तपास मुंबई पोलिस करणार की CBI यावरून वाद सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर CBI कडे हे प्रकरण सुपूर्त करण्यात आलं. आता सुप्रमी कोर्टाकडून याबाबत तपास केला जातोय. मात्र एक महिना तपास होऊनही CBI ला सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांतची हत्या केलीये असे ठोस पुरावे सापडले नसल्याचं समजतंय. महिन्याभराच्या तपासानंतर CBI चं पथक आता दिल्लीला रवाना झालंय.

आतापर्यंत CBI ने काय काय तपास केला, याचा अहवाल आता CBI च्या दिल्ली मुख्यालयाला सादर केला जाणार आहे. त्यामुळे महिनाभर तपास करून CBI च्या हाती काहीच लागलं नाही का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. 

महत्त्वाची बातमी - आरे साईटवर मोठ्या हालचाली, मुंबई मेट्रो ३ कारशेड साईट बंद करून आवारावर सुरु

CBI तपासाची पुढची दिशा काय ? 

सुशांत सिंह राहजपूत मृत्यूप्रकरणी CBI ने आतापर्यंत जो तपास केलाय त्याबाबत एक अहवाल तयार करून दिल्लीतील CBI मुख्यालयाला तो अहवाल सादर केला जाणार आहे. याबाबत मनोज शशिधर यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. शशिधर यांच्याकडून सल्ला आणि मदत घेऊन CBI पथक पुढील तपास करण्यासाठी पुन्हा मुंबईत येणार आहे.  सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी आता पहिल्या टप्प्यातील तपास पूर्ण झाल्याचं CBI ने सांगितलंय.  

मागील महिन्याच्या १९ तारखेला CBI ची टीम मुंबईत आली होती. मुंबईत CBI दाखल झाल्यानंतर अनेकांचे जबाब नोंदवले गेलेत. याप्रकरणी तब्बल २० जणांचे जबाब नोंदवले गेलेत. मात्र यावरून सुशांतची हत्या झालीये हे स्पष्ट होत नाही. दरम्यान समोर येणाऱ्या माहितीनुसार सुशांतने आत्महत्याच केलीये हे समोर येतंय. मात्र आत्महत्येस जबाबदार कोण ? याचाही तपस CBI करत आहे.  

महत्त्वाची बातमी -  तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन गेली कार, पुढे झालं असं की...

NCB टीममधील एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह : 

सुशांतच्या मृत्यूनंतर ड्रग्सबाबतचा अँगल देखील समोर आलाय. याप्रकरणात NCB तपास करतंय. रिया, तिचा भाऊ शोविक आणि इतरांची चौकशी याच टीमकडून केली जातेय. या टीममधील एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर येतंय. त्यामुळे आता याप्रकरणी तपास करणारे अधिकारी आता क्वारंटाईन झालेत. त्यांची टेस्ट देखील केली जाणार आहे. अँटीजेन टेस्ट नंतर ते याबाबतचा तपास पुढे नेणार आहेत.

sushant singh rajput death investigation central bureau of investigation team returned to delhi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput death investigation central bureau of investigation team returned to delhi