सीवूडस्‌मध्ये बेकायदा झोपड्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

नेरूळ - सुनियोजित शहर असा नावलौकिक मिळवलेल्या नवी मुंबई शहराला दिवसागणिक झोपड्यांचा विळखा वाढत चालला आहे. त्यामुळे शहरांतील बेकायदा झोपड्यांवर कारवाईचे आदेश पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. त्यानुसार दिघा, तुर्भे येथे कारवाई केली जात आहे. अशीच कारवाई सीवूडस्‌ रेल्वेस्थानकाच्या बाजूला असलेल्या सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर उभारलेल्या झोपड्यांवर करावी, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे. 

नवी मुंबईतील सीवूडस्‌ या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. रेल्वेच्या पश्‍चिमेला सिडकोचा मोकळा भूखंड आहे. या भूखंडाभोवती सिडकोने तारेचे कुंपण घातले होते. हे कुंपण तोडून त्यावर बेकायदा झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. या झोपड्यांतील लहान मुले रेल्वे मार्गालगतच खेळत असल्याने अपघाताचा धोका आहे. या बेकायदा झोपड्या उठवाव्यात यासाठी वारंवार पालिका व सिडकोच्या अतिक्रमणविरोधी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत; पण कारवाई झालेली नाही. अशी तक्रार स्थानिक नगरसेवक अंकुश गावडे यांनी दिली. आता झोपड्यांची संख्या कमी असतानाच त्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

स्थानकाच्या पश्‍चिमेला झोपड्यांतील लहान मुले भीक मागण्याचे काम करतात. ती रेल्वेरुळांलगत खेळत असतात. त्यामुळे केव्हाही येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता आहे.बेकायदा झोपड्यांत राहणारे लोक सतत रेल्वेरुळांवरूनच ये-जा करतात. त्यामुळे बेकायदा झोपड्यांवर कारवाई व्हायला हवे.भूखंडाभोवतालचे तारेचे कुंपण तोडून झोपडीनगर होईपर्यंत सिडको व पालिका प्रशासन दुर्लक्ष का करते? शहराला बकाल रुप देणाऱ्या अशा झोपड्यांवर तत्काळ कारवाई व्हायला हवी. - समीर बागवान, शाखाप्रमुख शिवसेना

Web Title: Sivudas in illegal huts