esakal | मुख्यमंत्री म्हणाले होते, "नाहीतर पुन्हा सगळं बंद करावं लागेल"; तसंच झालंय 'सहा' मोठी शहरं टोटल बंद
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री म्हणाले होते, "नाहीतर पुन्हा सगळं बंद करावं लागेल"; तसंच झालंय 'सहा' मोठी शहरं टोटल बंद

कोरोनाचा विस्फोट आणि MMR मधील ६ मोठी शहरं पुन्हा बंद 

मुख्यमंत्री म्हणाले होते, "नाहीतर पुन्हा सगळं बंद करावं लागेल"; तसंच झालंय 'सहा' मोठी शहरं टोटल बंद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : एकीकडे मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आलाय. तर दुसरीकडे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणजे MMR मधील ५ मोठी शहरं पुन्हा एकदा १० दिवस बंद करावी लागलीयेत. देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मिशन बिगिन अगेन २ राज्यात कोरोनामुळे बंद ठेवण्यात आलेल्या व्यापार, सोयी सुविधांमध्ये शिथिलता देण्यात येत होती.

मात्र याच देऊ केलेल्या शिथिलतेमुळे मुंबईला जोडून असलेल्या मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमालीची वाढताना पाहायला मिळतेय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या आधीच सूचित केल्याप्रमाणे, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, पनवेल , मीरा भाईंदर आणि उल्हासनगर आता पुन्हा एकदा बंद करण्यात आलंय. या सर्व शहरांमध्ये १० दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. 

मोठी बातमी - थरथरत्या हाताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका,असू शकतो 'हा' मेंदूचा गंभीर आजार
 

कुठे किती टक्के वाढ झाली ?

  • मुंबई  मनपात ९४ टक्के वाढ 
  • ठाणे  मनपात १६६  टक्के वाढ 
  • पनवेलमध्ये ३६४ टक्के वाढ 
  • मिरा-भाईंदर मनपात ४१४ टक्के वाढ 
  • कल्याण-डोंबिवली मनपात  ४६९ टक्के वाढ 

वरील आकडेवारी पहिली तर ही जून महिन्याची आकडेवारी आहे. जून महिन्यात मिशन बिगिन आजच्या पहिल्या टप्प्याची सुरवात झाली. अनेक ऑफिसेस सुरु झालेत. कर्मचारी कामावर जाऊ लागलेत आणि त्यामुळेच कोरोनाचा चढता आलेख पाहायला मिळाल्याचं तज्ज्ञ सांगतायत.दरम्यान कोरोना रुग्णवाढीचा आकडा कमी करण्यासाठी सहा मोठी शहरं आता बंद ठेवण्याचा निर्णय झालाय. सुरवातीच्या लॉकडाऊन प्रमाणे म्हणजेच लॉकडाऊन १ प्रमाणे या दहा दिवसांच्या लॉक डाऊनचे नियम असणार आहेत.

मोठी बातमी - तज्ज्ञ सांगतायत जुलै आणि ऑगस्टमध्ये कोरोना माजवणार हाहाकार,रुग्णसंख्या 'इतकी' वाढू शकते..

लॉकडाऊन १ मध्ये जसे नियम होते जवळजवळ त्याच पद्धतीने या साही शहरांमध्ये लॉकडाऊन पाळला जाणार आहे. यामध्ये  अत्यावश्यक सेवा ज्यामध्ये मेडिकल स्टोर्स, दवाखाने सुरु राहतील, सकाळी ५ ते १० या वेळेतील दूध विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. या शहरांमध्ये भाजी मार्केट्स बंद राहणार आहेत. या लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन डिलेव्हरी सुरु ठेवता येणार आहे. म्हणजेच गरज पडल्यास तुम्ही जवळच्या हॉटेलच्या किचनमधून घरी जेवण मागवू शकतात. सोबतच गॅस एजन्सी, बँका, ATM देखील सुरु राहणार आहेत. आपल्या पाळीव प्राण्यांसाठी पेट हॉस्पिटल्स आणि खाद्य दुकाने सुरु राहतील.

दरम्यान या दहा दिवसांच्या काळात नागरिकांनी वर्क फ्रॉम होम करणं पसंत करावं असं सांगण्यात आलंय. कुणालाही विना मास्क घराबाहेर जाण्याची परवानगी नाही. एकावेळी पाच पेक्षा अधिक व्यक्ती एका ठिकाणी एकत्र येऊ शकत नाहीत. या काळात आपल्या आसपाची सम विषम पद्धतीने सुरु केलेली दुकानं मात्र बंद राहणार आहेत. 

six big cites in mmr will face 10 days strict lockdown in mission begin again two
 

loading image