कोरोना आपत्तीमध्ये न सांगता राहिलेत गैरहजर, मग काय आता ओढवली ही वेळ...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषीत केली असुन, या काळांत सर्व पोलिसांनी कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई : कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषीत केली असुन, या काळांत सर्व पोलिसांनी कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पण त्यानंतरही गैरहजर राहिलेल्या सहा पोलिसांविरोधात बोरीवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला आहे. त्यात एका महिला पोलिसाचाही समावेश आहे.

बोरीवली पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस नाईक ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून बोरीवली पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस कायदा 1951, चे कलम 145 आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005 कलम 56 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक पोलिस नाईक व पाच पोलिस शिपायांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात एका महिला पोलिस शिपायाचाही समावेश आहे

मोठी बातमी - महावितरणचा वेबिनारद्वारे ग्राहकांशी संवाद; वीजबिलांबाबत संभ्रम दूर करण्यासाठी  तक्रार निवारण कक्ष सुरु.. 

देशांत सर्वात जास्त कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहेत. त्यातमध्ये मुंबईत सर्वात जास्त कोरोनाचा फैलाव झाला आहे. कोरोनाला  राष्ट्रीय आपत्ती म्हणुन घोषीत करण्यात आली आहे. तर नागरीकाना कोरोना पासुन वाचविण्यासाठी राज्यतील पोलीस दल, सुरक्षा यंत्रणेतील 55 वर्षाखालील सर्व अधिकारी-कर्मचा-यांना कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतरही हे सर्व पोलिस कर्तव्यावर हजर झाले नव्हते. त्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात कडून नोटीस बजावूनही ते कर्तव्यावर हजर झाले नाही.

त्यानंतर पोलिस उपायुक्त परिमंडळ 11 कार्यालयाकडूनही नोटीस बजावण्यात आली होती. त्याशिवाय तोंडी आदेशही देण्यात आले होते. त्यानंतरही ते कर्तव्यावर हजर न राहिल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक महिला पोलिस 2018 पासून कर्तव्यावर उपस्थीत नव्हती. पण सध्या आपत्ती कायदा लागू करण्यात आल्यानंतरही कर्तव्यावर उपस्थित न राहिल्यामुळे तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय एक पोलिस शिपाई 3 जून पासून विलगीकरणात होता.

मोठी बातमी - बदलापूरमध्ये 65 हजारांच्या तपासणीत केवळ' इतके' नागरिक संशयित; घरोघरी प्राथमिक चाचणी मोहिमेला उत्तम प्रतिसाद...

त्यानंतर 16 जूनपासून तोही कामावर हजर झाला नसल्याचे एका अधिका-याने सांगितले. तर एक पोलिस शिपाई 31 मार्च पासून 10 जूनपर्यंत गैरहजर होता. त्याबाबत कोणत्याही पोलिसांने कोणतीही परवानगी अथवा पूर्व कल्पना दिली नव्हती. त्यामुळे नोटीस व दूरध्वनी करूनही कर्तव्यावर गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरोधात बोरीवली पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. गुन्हा दाखल करण्यात आलेले पोलिसांची नियुक्ती बोरीवली पोलिस ठाण्यात आहे.

यापूर्वी अशा पद्धतीने विना परवानगी गैर हजर राहिलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएस) 17 जवानांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र पोलिस अधिनियम व राज्य राखीव पोलिस अधिनियमांतर्गत वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

six police faces action for not attending their duty while disaster management act is on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six police faces action for not attending their duty while disaster management act is on