बदलापूरमध्ये 65 हजारांच्या तपासणीत केवळ' इतके' नागरिक संशयित; घरोघरी प्राथमिक चाचणी मोहिमेला उत्तम प्रतिसाद..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

बदलापूर शहरात पालिका प्रशासनाने घरोघरी जाऊन प्राथमिक चाचणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सहा दिवसांत पालिकेच्या टीमने 22,148 घरांमध्ये जाऊन 64,914 नागरिकांची तपासणी केली आहे.

मुंबई : बदलापूर शहरात पालिका प्रशासनाने घरोघरी जाऊन प्राथमिक चाचणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सहा दिवसांत पालिकेच्या टीमने 22,148 घरांमध्ये जाऊन 64,914 नागरिकांची तपासणी केली आहे. यातील केवळ 39 नागरिक संशयित आढळले आहेत, अशी माहिती प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी दिली आहे. पालिकेच्या पथकांकडून चांगले काम सुरु असून त्याला नागरिकांचेही सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

 हेही वाचा: मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये दिसून येतंय 'हे' नवीन लक्षण, डॉक्टर्स देखील झालेत हैराण..

 

जगतसिंग गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या खाते प्रमुखांची नुकतीच बैठक झाली. यावेळी गिरासे यांनी अधिकाऱ्यांना या योजनेची सविस्तर माहिती समजावून सांगितली. यावेळी मुख्याधिकारी दीपक पुजारी, जयेश भैरव, डॉ. राजेश अंकुश, डॉ. हरेश पाटोळे, राजेंद्र बोरकर, प्रवीण वडगाये, दशरथ राठोड, किरण गवळे, सुरेंद्र उईके, सिद्धार्थ पवार, विलास मुठे, प्रतीक्षा सावंत आदी अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांना सहकार्यांचे आवाहन:

शहरातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक, शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी सदस्य आणि सर्व नागरिकांनी पालिकेच्या या पथकांमधील सदस्यांना सर्व माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन गिरासे यांनी केले आहे.

हेही वाचा: कोरोना मागोमाग लागूनच मुंबईवर येऊ शकतं 'हे' मोठं संकट; मुंबईकरांना वाचवणार आता एकच गोष्ट...

"दहा दिवसांची ही विशेष मोहीम असून यात दोन सदस्यांचे एक पथक अशी 107 पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाच्या सदस्यांना थर्मामीटरपासून सर्व आवश्यक ते साहित्य पुरविण्यात आले आहे. यापुढे उर्वरित सर्व कुटुंबीयांचीसुद्धा तपासणी करण्यात येणार आहे" असे उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी सांगितले आहे. 
65 thousand people tested and 39 people are suspect of covid in badalapur 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 65 thousand people tested and 39 people are suspect of covid in badalapur