

Atal Setu and Coastal Road Connected
ESakal
मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू प्रकल्पामुळे लक्षणीय दिलासा मिळाला आहे. तर सिडकोने आता हा पूल त्यांच्या कोस्टल रोडला जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून, सिडको गव्हाण गावातील शिवाजी नगर इंटरचेंजवर सहा रॅम्प बांधणार आहे, ज्यामुळे उरण, पनवेल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीए आणि राजधानी मुंबईमधील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.