Mumbai: मुंबई पालिकेकडून चूक मान्य! फोटोपासच्या तांत्रिक अडचणीवर तोडगा काढणार, ‘अनिर्णित’ ठरलेल्यांना लवकरच न्याय

Mumbai News: पात्रता सर्वेक्षणातील 'अनिर्णित' धारावीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. बीएमसी फोटोपासच्या तारखेचा तिढा सुटणार आहे.
BMC

BMC

Esakal

Updated on

वास्तव्याचा सबळ पुरावा म्हणून मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात येणारा 'फोटोपास' सादर करूनही पात्रता सर्वेक्षणात 'अनिर्णित' श्रेणीत टाकण्यात आलेल्या बहुतांशी धारावीकरांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. पालिकेच्या फोटोपासवरील तारखेच्या तांत्रिक अडचणीमुळे संभ्रम निर्माण झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी कबूल केले असून, यावर तोडगा काढण्यासाठी आता पाऊल उचलण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com