Dharavi slum tourism

Dharavi slum tourism

ESakal

धारावीत ‘स्लम टुरिझम’ची ‘डिमांड’ वाढली! गरीबी पाहण्यासाठी टुरिस्ट २ तासांसाठी १५ हजार रुपये देतात; गरीबीही झाली विक्रीचा माल!

Dharavi slum tourism: स्वप्नांचे शहर असलेल्या मुंबईमध्ये देशभरातून लोक त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात. हे असे शहर आहे जिथे सर्वकाही विक्रीसाठी आहे आणि खरेदी केले जाते. लोक मातीपासून दगडापर्यंत सर्व काही विकतात. गरिबी देखील विकली जात आहे.
Published on

Dharavi slum tourism: भारतात गरिबी एक वस्तू बनत चालली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाणारी धारावीची गरिबी पाहण्यासाठी परदेशातील लोक आकर्षित होतात. आता धारावीचा पुनर्विकास सुरू आहे. टूर आणि ट्रॅव्हल कंपन्याही याचा फायदा घेत आहेत. अनेक जाहिराती आणि सोशल मीडिया मोहिमा पर्यटकांना पुनर्विकास करण्यापूर्वी येथील रहिवाशांचे जीवन पाहण्यासाठी येण्याचे आवाहन करत आहेत. यासाठी पर्यटकांकडून मोठी रक्कम आकारली जात आहे. दिवसा धारावीला पाहण्यासाठी आणि घरात रात्र घालवण्यासाठी ते पैसेही आकारतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com