'मराठी भाषा गौरव दिन' कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

मुंबई: आज महाराष्ट्रात सर्वत्र "मराठी भाषा गौरव दिन" साजरा करण्यात येतो आहे. विधीमंडळातही मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. विधिमंडळाच्या परिसरात आज सरकारकडून ग्रंथ पूजा करण्यात आली आणि ग्रंथ दिंडीही काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ग्रंथ पालखीचे भोई झाले होते. विशेष म्हणजे विरोधक आणि सत्ताधारी यावेळी एकत्र दिसले.

मुंबई: आज महाराष्ट्रात सर्वत्र "मराठी भाषा गौरव दिन" साजरा करण्यात येतो आहे. विधीमंडळातही मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. विधिमंडळाच्या परिसरात आज सरकारकडून ग्रंथ पूजा करण्यात आली आणि ग्रंथ दिंडीही काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ग्रंथ पालखीचे भोई झाले होते. विशेष म्हणजे विरोधक आणि सत्ताधारी यावेळी एकत्र दिसले.

मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात दीपप्रज्वलन करत असताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा हात धरून समोर बोलवलं आणि दीपप्रज्वलन करण्याची विनंती केली. हे दोघंही आता विरोधी जरी असले तरी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं एकत्र एकाच मंचावर दिसले. 

आज 'अभिजात मराठी'साठी विधानसभेत ठराव मांडला जाणार आहे. यापूर्वी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी जपण्याचं आवाहन केलं.

VIDEO प्रचंड व्हायरल ! रस्त्यावरून चालणारी ती 'डोकं' नसलेली व्यक्ति कोण...  

काय म्हणाले उद्धव ठाकरे: 
  
"हा माझ्या मातृभाषेचा नाही तर माझ्या आईचा सन्मान आहे. मराठी भाषेचा गौरव एकच दिवस का करायचा? तो आपण रोज केला पाहिजे. प्रत्येक वेळी मराठी भाषेबद्दल वाद करण्यापेक्षा मराठी भाषा जोपासण्याची गरज आहे. मराठी ही साधीसुधी भाषा नाहीये. एकेकाळी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला तरी शत्रू घाबरायचे. मराठी किती वर्ष जुनी आहे, मला माहिती नाही. मात्र मला माझ्या भाषेचा अभिमान आहे. मराठी भाषेच्या इतिहासाबद्दल अनेक जण पुरावे मागतात. ही भाषाच नसती तर पुरावे मागणारे जन्माला आले नसते. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. शाळांची नावं मराठीत असण्याची गरज आहे. मराठी भाषा आपली मातृभाषा आहे मग ती सक्तीची का करावी लागते? जिथे जिथे संकट आलं तिथे माझी मराठी धावून गेली आहे. या महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य झालीच पाहिजे. मराठी भाषा सुद्ध बोलल्या आणि लिहिल्या गेली पाहिजे. संतांनी दिलेला वसा आपण टिकवला पाहिजे. मराठी ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोरली गेली आहे. त्यामुळे मराठी भाषा टिकवणं आपल्या सर्वांची जवाबदारी आहे." असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटलंय.  

मोठी बातमी - 'आदित्यने वडील मुख्यमंत्री झाल्यावर 'छंद' पूर्ण केले नाहीत'; अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून खणखणीत उत्तर

मुलांनी घरात मराठीच बोलावं:

मुलांना इंग्रजी शाळेत टाका, मात्र मुलांनी घरात मराठीत बोलावं. मराठी संस्कृती जपणं आपलं कर्तव्य आहे. मराठी सण उत्सव साजरे केले पाहिजे, कोणती भाषा ओठातून नाहीतर पोटातून आली पाहिजे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे", असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलंय.

Uddhav Thackeray addressed during Marathi bhasha din program      


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray addressed during Marathi Bhasha din program