...तर "जैत रे जैत' चित्रपटाने  आणखी कमाल केली असती 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

मुंबई - "जैत रे जैत' चित्रपटाचा शेवट वेगळा असता; तर आणखी इतिहास घडला असता, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. स्मिता पाटील स्मृती पुरस्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

मुंबई - "जैत रे जैत' चित्रपटाचा शेवट वेगळा असता; तर आणखी इतिहास घडला असता, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. स्मिता पाटील स्मृती पुरस्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या 32 व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दुसरा स्मिता पाटील पुरस्कार "जैत रे जैत' चित्रपटाला देण्यात आला. या समारंभात अभिनेत्री मुक्ती बर्वे हिला स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. "जैत रे जैत' चित्रपटाचे निर्माते उषा मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार स्वीकारला. गो. नि. दांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट बनवणे खूप कठीण होते. जब्बार पटेल यांनी हे काम उत्तम केले आहेच; परंतु अखेरीस नायकाची झुंज मधमाश्‍यांच्या पोळ्याऐवजी वाघ अथवा सिंहाशी दाखवली असती, तर या चित्रपटाने आणखी कमाल केली असती, असे मत पुरंदरे यांनी व्यक्त केले. 

या समारंभात अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला स्मिता पाटील कौतुक पुरस्कार प्रदान करण्यात आला. उषा मंगेशकर यांचा शनिवारी (ता. 15) वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांना राधाकृष्णाची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. आमदार ऍड्‌. पराग अळवणी, आर्च एंटरटेन्मेंटचे विनीत आणि अर्चना गोरे, "जीवनगाणी'चे प्रसाद महाडकर आणि स्मिता पाटील यांची मैत्रीण ललिता ताम्हणे यांनी स्मिता पाटील स्मृती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.

Web Title: Smita Patil Memorial Award ceremony