4522 किलो सोन्याची तस्करी आणि झवेरी बाजार कनेक्शन...

4522 किलो सोन्याची तस्करी आणि झवेरी बाजार कनेक्शन...

मुंबई : दुबईतून 4522 किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) एकाला अटक केली अटक केली. या टोळक्‍याने वर्षभरात 1473कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यात झवेरी बाजारमधील काही व्यापाऱ्यांचाही समावेशआहे.अमजद सलीम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या तारा गुजरातमधील काही व्यापाऱ्यांशी जोडल्या गेल्यात. 

मार्च महिन्यात तस्करांनी सोन्याचा साठा गुजरातवरून मुंबईत आणला असल्याची गुप्त माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार डीआरआयच्या पथकांनी डोंगरी, झवेरी बाजारात छापे मारले. त्यावेळी सात तस्करांना अटक केली होती. तस्करी करून आणलेला सोन्याचा साठा आणि जवळजवळ कोटींची रक्कम सापडली.

35 कोटींचे सोने व दोन कोटींची रक्कम असा एकूण 37 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी आणखी सात जणांना अटक केली असून जानेवारी 2017 पासून मार्च 2019 प्रर्यंत या टोळक्‍याने 4522 किलो म्हणजेच 1473 कोटी रुपये किमतीचे सोने दुबईतून तस्करी करून भारतात आणल्याचे निष्पन्न झाले आहे. 

तस्करांनी समुद्रामार्गे हा सोन्याचा साठा गुजरातमध्ये आणाचे. तेथील मुद्रा बंदरावर पितळ असल्याचे सांगून आणलेला सोन्याचा कंटेनर बाहेर काढले जायचे. त्यानंतर तो कंटेनर रस्त्याने मुंबईत आणले जायचे. त्या कारवाईत 170 किलो सोने हस्तगत करण्यात आली होती. याप्रकरणी आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे.

परदेशातून सोने तस्करी केल्यानंतर 15.5 टक्के आयात कर भरावा लागतो. त्याशिवाय जेवढे सोने आयात करण्यात त्यातील 30 टक्के सोन्याच्या दागिन्यांची निर्यात करावी लागते. आरोपींनी अशा पद्धतीने 15.5 टक्के कर चुकवून सरकारची फसवणूक केली आहे. त्याच्या मार्फत या सोन्याच्या तस्करीमागे 229 कोटींचा कर चुकवला आहे. निसार अलीयार हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याची माहिती डीआरआयच्या तपासात निष्पन्न झाली आहे.

smuggling of gold worth 4522 kg and its zaveri bazar connection 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com