ठाण्यात लोकलमध्ये आढळला साप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

टिटवाळा सीएसएमटीच्या आच वाजून तेहतीस मिनिटांच्या धीम्या लोकलमधील फर्स्ट क्लास मधील डब्यात ठाणे स्थानकात साप आढळला.

मुंबई : टिटवाळा सीएसएमटीच्या आच वाजून तेहतीस मिनिटांच्या धीम्या लोकलमधील फर्स्ट क्लास मधील डब्यात ठाणे स्थानकात साप आढळला.

डब्यातील पंख्यावर साप बसला होता, त्याला एका प्रवाशाने पाहिले आणि आरडाओरडा केला असता सर्व प्रवासी डब्यातून खाली उतरले. त्यानंतर एक माणूस काठी घेऊन आला आणि त्याने त्या सापाला पंख्यावरून खाली पाडले व काठीने डब्याखाली फेकले. अचानक लोकलमध्ये साप आढळल्याने प्रवाशांमध्ये भीतीने मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला.

Web Title: snake found in local train at thane

टॅग्स