नोटाबंदीमुळे चोरटा गजाआड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

मुंबई - घरफोडी करून चोरलेल्या जुन्या नोटा बॅंकेत भरल्यामुळे आरोपीला तुरुंगाची हवा खावी लागली. साईनाथ धरमा येलदोडा असे आरोपीचे नाव आहे. त्याला 6 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

मुंबई - घरफोडी करून चोरलेल्या जुन्या नोटा बॅंकेत भरल्यामुळे आरोपीला तुरुंगाची हवा खावी लागली. साईनाथ धरमा येलदोडा असे आरोपीचे नाव आहे. त्याला 6 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

साईनाथ हा तेलंगणाचा रहिवासी असून, मुंबईत कामाठीपुरा परिसरात राहतो. तो लग्नसमारंभात रांगोळी काढण्याचे काम करतो. नोव्हेंबरमध्ये त्याने एकाकडून ग्रॅंट रोडला जाण्यासाठी मोटारसायकल घेतली. चाव्यांच्या जुडग्यात मोटारसायकलच्या मालकाच्या घराचीही चावी होती. साईनाथने त्यावरून घराची बनावट चावी बनवली. नोव्हेंबरमध्ये हे कुटुंब लग्नाकरता बाहेर गेल्याचे समजल्यावर साईनाथने बनावट चावीने घराचे दार उघडले आणि एक लाख 17 हजारांचे दागिने व दीड लाखाच्या पाचशे; तसेच हजारच्या नोटा चोरल्या. त्याच काळात केंद्र सरकारने पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून काढून घेतल्या. आता हे पैसे कुठे ठेवावेत, असा प्रश्‍न साईनाथला पडला. जुन्या नोटा घेऊन तो नातेवाइकाकडे गेला. आपलेच पैसे असल्याचे भासवून त्याने या नोटा त्याच्या बॅंकेतील खात्यावर जमा केल्या. 15 नोव्हेंबरला घरफोडीप्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. संशयाची सुई साईनाथकडे वळली. त्याने चोरलेल्या नोटा बॅंकेत जमा केल्या असल्याची माहिती हिवरे यांना मिळाली. गुरुवारी साईनाथला अटक झाली. त्याने गुन्हा मान्य केला.

Web Title: sneaky arrested by currency ban