वाचाल तर थक्क व्हाल! तब्बल इतक्या मुंबईकरांनी घेतला मद्याच्या 'होम डिलिव्हरी'चा लाभ

वाचाल तर थक्क व्हाल! तब्बल इतक्या मुंबईकरांनी घेतला मद्याच्या 'होम डिलिव्हरी'चा लाभ

मुंबई : 15 मे रोजीपासून राज्यात ऑनलाईन मद्यविक्रीला सुरूवात झाली. त्यानंतर घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. मुंबई शहर आणि उपनगरात 15 मे रोजीपासून 5 जून 2020 पर्यंत तब्बल 34 हजार चार ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा दिली गेली आहे. राज्य शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. 15 मे रोजी ऑनलाईन सेवा सुरु होताच दोन दिवसातच मुंबईत 24,615 या ऑनलाईन ऑर्डर देण्यात आल्या होत्या. 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची आर्थिक परिस्थिती ढासळली. त्यासाठी ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारनं ऑनलाईन मद्यविक्रीस परवानगी दिली. त्यातच मुंबई जिल्हा हा दारूची होम डिलिव्हरीसाठी परवानगी देणारा हा शेवटचा जिल्हा होता. 

मुंबईत एकूण 1,190 किरकोळ दारूची दुकाने आहेत. मुंबईत 23 मे रोजी 3,062 ऑर्डर देण्यात आल्या. तर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 मे रोजी ही संख्या 18,964 होती आणि 25 मे रोजी ऑनलाईन ऑर्डरचा आकडा 24,615 वर पोहोचला. 

कशी कराल ऑनलाईन ऑर्डर
मद्य मागणी करण्याऱ्या ग्राहकाकडे आवश्यक मद्यसेवन परवाना नसल्यास ते तो परवाना या विभागाच्या www.stateexcise.maharashtra.gov.in किंवा www.exciseservices.mahaonline.gov.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन प्राप्त करु शकतील किंवा संबंधित दुकानदाराकडून विकत घेऊ शकतील. 
त्यानंतर ग्राहकाला त्यात आपला मोबाईल नंबर आणि नाव नमूद करावं लागेल.

आपला जिल्हा आणि पिन कोड नमूद करा.
सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणाऱ्या मद्य विक्री दुकानांची यादी दिसेल.
त्यापैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकनं करावी.

व्यवस्थित माहिती नमूद केल्यानंतरच ग्राहकांना ई-टोकन मिळणार आहे.
मिळालेल्या टोकनच्या आधारे ग्राहकास घरपोच दारू मिळेल. 
दारू घरपोच देण्यासाठी जी व्यक्ती जाईल, त्या व्यक्तिला मास्कचा वापर करणं अनिवार्य असेल. तसंच त्या व्यक्तीला वेळोवेळी हाताचे निर्जंतुकीकरण करावं लागणार आहे. या सगळ्याची दक्षता दुकानदाराने घ्यायची आहे.

ऑनलाईन मद्यविक्रीचे नियम आणि अटी 
जिल्हा प्रशासनाने मद्य विक्रीस परवानगी दिलेल्या जिल्ह्यातच ऑनलाईन मद्य विक्री करता येणार आहे.
तुमचा जिल्हा जर रेड झोनमध्ये असेल तर त्या जिल्ह्यात मद्यविक्री होणार नाही. 

घरपोच मद्यसेवा देण्याची जबाबदारी सर्वस्वी दुकानदारावर असणार आहे.
घरपोच सेवा देणारे कामगार यांची वैद्यकीय तपासणी करुन ते वैद्यकीयदृष्टया पूर्णपणे पात्र ठरल्यासच त्यांना विभागातर्फे तसे ओळखपत्र देण्यात येईल.
संबंधित घरपोच सेवा देणाऱ्या कामगारांना मास्क, हेड कॅप, हातमोजे, हॅन्ड सॅनिटायझर आणि वारंवार हातमोजे निर्जतुक करण्यासाठी सोडीयम हायपोक्लोराईडचाचा वापर करणं अनिवार्य आहे.
घरपोच सेवा देणाऱ्या प्रत्येक दुकानात जास्तीत जास्त 10 कामगाराच काम करतील.

सरकारच्या आदेशानुसार सदयस्थितीत घरपोच मद्यसेवा ही कोविड-19 /लॉकडऊन कालावधीच करताच लागू असेल.
मद्य बाळगणे, वाहतूक करणे इ. मद्यसेवन परवान्यातील तरतूदीचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही याची संबंधित दुकानदारांनी दक्षता घ्यावयाची आहे.

सरकारचे वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणं दुकानदार, Delivary boy आणि ग्राहकास बंधनकारक असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com