मध्य रेल्वेवर सोशल डिस्टंन्सिंगची फज्जा, पश्चिम रेल्वेवरही सारखीच परिस्थिती

प्रशांत कांबळे
Monday, 28 September 2020

रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कोंडी फुटत नसल्याने सोशल सोशल डिस्टंन्सिंगचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.

मुंबई: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सध्या लोकल सेवा सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या 500 तर मध्य रेल्वे मार्गावर 355 फेऱ्यांमध्ये 68 फेऱ्यांची वाढ करून आता 423 फेऱ्या धावत आहे. मात्र, रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कोंडी फुटत नसल्याने सोशल सोशल डिस्टंन्सिंगचा प्रश्न ऐरणीवर येत असून पश्चिम रेल्वे मार्गावर सुद्धा सहा अतिरिक्त फेऱ्या वाढवणार असून दोन महिला स्पेशल फेऱ्या धावणार असल्याची घोषणा पश्चिम रेल्वेनं केली आहे.

1 सप्टेंबरपासून मुंबई उपनगरातील खासगी आणि शासकीय कार्यालयांनी कर्मचारी संख्या वाढविली आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या अचानकच वाढली आहे. कर्मचारी वाढल्याने पुन्हा एकदा लोकल प्रवासामध्ये गर्दी दिसून येत आहे. त्यासाठी रेल्वे आणि राज्य प्रशासनाचे कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने, प्रवाशांच्या गर्दीत दिवसेंदिवस वाढ होतंय. त्यामुळे कोविड19 च्या काळात लोकल मधील सोशल सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडताना दिसून येत आहे.

अशा परिस्थितीत मध्य रेल्वेनं नुकतेच 68 फेऱ्या वाढवल्या आहे. मात्र लोकल प्रवासातील गर्दी ओसरताना दिसून येत नाही. पीक अवर्समध्ये अधिकच गर्दी होत असल्याचे चित्र, मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आहे. त्यामध्येच सोमवारपासून पश्चिम रेल्वे मार्गावर सुद्धा सहा वाढविण्यात येणार असून, त्यापैकी दोन फेऱ्या महिला स्पेशल धावणार आहे. यापैकी तीन लोकल फेर्‍या या विरार ते चर्चगेट अशा अप धीम्या मार्गावर धावतील तर तीन फेर्‍या चर्चगेट ते विरार अशी धीम्या डाउन मार्गावर धावणार आहे. तरीसुद्धा  मध्ये आणि पश्चिम रेल्वे पुढे प्रवाशांची गर्दी कमी करण्याचे आव्हान राहणार आहे.

 
राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने संयुक्तरित्या लोकल प्रवासातील कर्मचाऱ्यांची म्हणजे अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामध्ये रेल्वे प्रशासनाची जबाबदारी जास्त आहे. पोलीस यंत्रणा आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि कोविड 19 च्या जागतिक संकटाच्या प्राश्वभूमीवर अधिक यंत्रणा वाढविणे अपेक्षित आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासन कमी पडत आहे.

- वंदना सोनवणे, झेंड आरयुसीसी, सदस्य
 
रेल्वे प्रशासन फक्त सोशल माध्यमांवर प्रसिद्धी घेत आहे. प्रत्यक्षात मात्र प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आणि कोविड 19 च्या नियमांचे पालन करण्यासाठी कोणत्याही सुविधा पुरवत नसल्याचे दिसून येत आहे. मोचक्याच स्थानकावरील सुविधांचे फोटो व्हायरल करून रेल्वे प्रशासन धन्यता मानत आहे. नुकतेच मुसळधार पावसात बोरिवली स्टेशनवर झालेली गर्दीचे नियोजन सुद्धा रेल्वेला करता आले नसल्याने रेल्वे प्रशासन निर्णय क्षमतेत कमकुवत दिसून येत आहे.

- श्याम उबाळे, सरचिटणीस, कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना

-------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Social distancing Fail On Central and Western Railway


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social distancing Fail On Central and Western Railway